परभणी,दि 18 येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून तब्बल २११००.४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात केला जात आहे.त्यामुळे सोमवारी (दि18) पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तर धरणाच्या पुढील बाजूस असलेल्या जिंतूर-सेनगाव महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मराठवाड्यातून विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी (दि.१८) सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी येलदरी धरणाचे एकूण १० दरवाजे अर्धा मीटरने …
Read More »मराठवाडा
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा,शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेची मागणी
परभणी दि,18 परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक …
Read More »अखिल भारतीय ग्राहक पंचायत नूतन कार्यकारणी जाहीर
सेलू दि. 18 शनीवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक केशवराज बाबासाहेब मंदिर रोड वरील योगा हाॅल मध्ये दि 16 शनिवार रोजी संपन्न झाली असुन या बैठकीत सेलू तालुक्यातील कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांनी जाहीर केली असून या बैठकीस देवगिरी प्रांताध्यक्ष डाॅ विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, जिल्हा समन्वयक भगवान करंजे, जिंतूर तालूका अध्यक्ष मंचकराव देशमुख,जिल्हा …
Read More »काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन
परभणी, दि. 14 (प्रतिनिधी) परभणी व जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली.त्यांच्या …
Read More »वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा मराठवाड्यातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद.
परभणी,दि 14 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व …
Read More »रविवारी परभणीत नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभा
परभणी,दि 14 (प्रतिनिधी)ः ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था आणि परभणी शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभेचे रविवारी (दि.17) सायंकाळी 7 वाजता येथील बी.रघुनाथ सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या त्रैमासिक संगीत सभेत पं.जितेंद्र अभिषेकी यांचे नातू श्री.अभेद शौनक अभिषेकी, मयंक व अभिराम परळीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. यावेळी गीत इनामदार तबला, ॠतुराज …
Read More »आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा बहारदार सोहळा
पूर्णा प्रतिनिधी (सुशिलकुमार दळवी): गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून वाढदिवसाचा सोहळा आगळा-वेगळा साजरा करण्यात आला.दि.१२ ऑगस्ट रोजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान, महिलांसाठी साडीवाटप आणि दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा तिन्ही उपक्रमांचा समावेश होता. सकाळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …
Read More »परभणीच्या आर. पी. हॉस्पिटलच्या तत्परतेमुळे सात वर्षीय बालकाचे प्राण वाचले
परभणी,दि 14 ः परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. एका सात फूट खोल गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य देण्यात आले. परभणी शहरात एका भागात एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला. तब्बल तीन तास बेशुद्ध अवस्थेत गटारात …
Read More »विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज-एकनाथ जाधव
सेलू/प्रतिनिधी – विज्ञानाच्या शक्तीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे,बालपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी .वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो त्यासाठी विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले. अखिल भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत शिक्षण विभाग (पं.स.सेलू ) विवेकानंद प्राथमिक विद्यालय आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ( दि.१३ऑगस्ट,बुधवार) रोजी विवेकानंद विद्यालयात उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे ,गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण …
Read More »ध्येयप्राप्तीसाठी स्वतः मधील कौशल्य विकसित करा – डॉ.अंकित मंत्री यांचे प्रतिपादन
सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार उत्साहात सेलू – जीवनात आईवडील आणि शिक्षक यांचे नि:स्वार्थ प्रेम लाभत असते. याची कायम जाणीव ठेवा, त्यांच्या भावना कधीही दुखवू नका. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःमधील प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा आणि ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा परभणी येथील प्रसिद्ध अतिदक्षता आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकित अशोककुमारजी मंत्री यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालयातील …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com