सेलू,दि 22 ः येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार ( दि. २१ ) रोजी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके यांच्या अध्यक्षते खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आयोजित करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागताध्यक्ष पदी तर नगर सेवक सुबोध काकडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते …
Read More »मराठवाडा
प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी आयोजन
पूर्णा, (सुशिल दळवी) : मागील सुमारे ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार विक्रम काळे व आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येथील सुमन मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता प्राचार्या रजनीताई मोरे यांचा सेवागौरव समारंभ श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष …
Read More »उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा – ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम
सेलू ( प्रतिनिधी ) आजच्या काळात वृक्षतोड हा खुप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमीनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा. असे प्रतिपादन बुधवार ( दि. १८ ) रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली) यांनी केले. अलंकापुरी …
Read More »ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा
पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दि. 8 मार्च निमित्ताने आज 17 मार्च रोजी पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.मकर संक्रांतीच्या निमित्त “वाण नाहीतर, तर दान” या संकल्पनेतून सौ. मिराताई दादासाहेब टेंगसे (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. परभणी) यांनी मागील 11 वर्षा पासून …
Read More »संतांच्या चरणीच खरे सुख आहे – ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज
सेलू/प्रतिनिधी संतसंगतीमुळे आत्मिक सुख आणि ईश्वरभक्तीची गोडी लागते.संतांचे आचरण शुद्ध असते व ते समाजाला योग्य दिशा दाखवतात.संत म्हणजे नैतिक मूल्ये,अढळ ईश्वरभक्ती व माणुसकीची सेवा करणारे थोर पुरुष असतातअसे प्रतिपादन संत बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह संस्थानचे (मेहकर) ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज यांनी केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी रथामागे दिंडी क्रमांक १५ चे मालक वै.ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या …
Read More »संकटात देशासाठी धावून जातो तोच खरा नागरिक- स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
चौथ्या दिवशीही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – देश टिकला तरच धर्म टिकतो. संस्कृती टिकते. देशाच भवितव्य आपल्या हाती असते. राष्ट्राच्या कल्याणा करिता आपण जागृत राहाणे गरजेचे असते. जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा राष्ट्र हितासाठी जो धावून जातो तोच खरा नागरिक असतो. हाच संदेश महाभारत कथेतून मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. …
Read More »विद्यार्थ्यांत ज्ञानाची भूक निर्माण करतो तोच खरा शिक्षक-गोविंददेव गिरी जी महाराज
सेलू / नारायण पाटील – येथील नूतन इंग्लिश स्कूल, सेलू या विद्यालयाचा बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू असा नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न झाला. सी.बी.एस.सी. दर्जा प्राप्त बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार कोनशिलेचे अनावरण रविवार ( दि. १५) रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी श्रीगोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय …
Read More »आपल्यातील सुखाचा शोध घ्या – बंडा तात्या कराडकर
सेलू ( प्रतिनिधी ) जगात सद्गुरू बद्दल सर्वांचे एकमत आहे. पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत. पण सुख आपल्यापाशीच आहे. तेव्हा आपली सुप्त शक्ती जागृत करा. आपल्यातील सुखाचा शोध घ्या. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता, औदार्य हे तिनही गुण आहेत.जो विठ्ठलाला शरण जातो त्याला काहीही कमी पडत नाही. गतीला योग्य दिशा असेल तरच प्रगती होते. असे प्रतिपादन …
Read More »अवैध वाळू प्रकरणी बातम्या लिहिल्याचा राग; पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप, तलाठ्यावर कारवाईची मागणी !
पाथरी प्रतिनिधी तालुक्यातील डाकूपिंपरी परिसरातील अवैध वाळू उत्खननाबाबत वारंवार बातम्या प्रकाशित केल्याचा राग मनात धरून महसूल विभागातील तलाठी अरविंद चव्हाण यांनी पत्रकार गजानन घुंबरे यांच्या विरोधात धमकीवजा भाषा वापरून कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी गजानन घुंबरे यांनी १ …
Read More »17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com