परभणी, दि १९ : शासकीय कार्यालयांतील स्वच्छता आणि कार्यालयीन शिस्तीबाबत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कठोर भूमिका घेतली आहे. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान शुक्रवारला विविध शासकीय कार्यालयांची पाहणी करताना सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आढळल्याने त्यांनी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त रुजविण्यासाठी जी. श्रीकांत …
Read More »मराठवाडा
सरस्वती प्राथमिक विद्यालयात ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा
हिंगोली, ( दि. १८ ) जवळा बाजार येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात जागतिक हात धुवा दिना निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पूरजळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आरोग्य सेवक प्रसेनजित दातार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे हात धुण्याच्या योग्य पद्धती दाखवल्या. दैनंदिन जीवनात आणि जेवणापूर्वी तसेच …
Read More »नारायण सुर्वे यांच्या कवितेतून शोषित वर्गाच्या जीवनाचे चित्रण ………प्रा.डाॅ. आशा गिरी.
सेलू,दि 18 (प्रतिनिधी): नारायण सुर्वे यांच्या कवितेत शोषित,कष्टकरी, समाजासह शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी लेखणी चालवली. नारायण सुर्वे यांनी आपले आयुष्य कामगारांच्या हक्कांसाठी जगले.आपले जीवन कसे जगावे किंवा व्यतीत व्हावे हा प्रत्येकाचा वेगळा स्थायीभाव आहे,परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्य वेचले तर त्याचे समाजात शेवटपर्यंत नांव व काम राहाते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कविता आणि नारायण सुर्वे म्हणजे एक समीकरण …
Read More »गोपाळकाला आनंदोत्सव व समाधानाचे प्रतीक -ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर
सेलू,दि 18 (प्रतिनिधी)ः सेलू तालुक्यातील श्रीक्षेत्र वालूर येथे वै. प. पु. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या पुण्यतिथी( १७१वा ) सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. उपजोनिया पुढती येऊ |काला खाऊ दहीभात | या जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर विवेचन करताना महाराज म्हणाले की, भक्तांसोबत एकत्र येऊन काल्याचा प्रसाद …
Read More »सेलू येथील मुंजाबा महाराज मंदिर कामकाज बांधकामाचे पूजन
सेलू( प्रतिनिधी ) येथील सेलू परभणी रोडवरील न प च्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळ असलेल्या अत्यंत पुरातन मुंजाबा महाराज मंदिरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच मंदिर च्या छताच्या कामास सुरुवात केली जाणार आहे.रविवारी (दि.18) प पु भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या हस्ते मुंजाबा महाराज यांची विधिवत पूजा करून कामाच्या अंतिम टप्प्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी अँड कृष्णा शेरे, कै राधाबाई …
Read More »कळमनुरीत ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न,उपनगराध्यक्ष शिवराज पाटिल व संघर्ष मित्र मंडळाचा उपक्रम
कळमनुरी,दि 18 (प्रतिनिधी) ः येथील वीरशैव दुर्गामहोत्सवानिमित् उपनगराध्यक्ष शिवराज पाटील चौधरी व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कवी महादेव ढोणे यांच्या बहारदार सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत आली. या स्पर्धेला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम …
Read More »नशेच्या विळख्यात अडकू नका; आयुष्याला नवी दिशा द्या! – निळकंठ गायकवाड
हिंगोली,दि 18 व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाका, शरीराची काळजी घ्या आणि देशाच्या विकासात योगदान द्या, असे आवाहन व्याख्याते निळकंठ गायकवाड यांनी तरुणाईला केले. ‘माझा भारत’ अभियानांतर्गत आयोजित युवा संसदेत तरुणाईने व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय युवा नेतृत्व योजना आणि ‘माझा भारत’ उपक्रमांतर्गत शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे ब्लॉक स्तरावर ‘विकसित …
Read More »आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परभणीत महायुतीची बैठक
परभणी,दि 17 छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रविवार (दिनांक 18 ) रोजी सांयकाळी पाच वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचार करत आहेत. …
Read More »महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची गंगाखेड शाखेची मासिक बैठक संपन्न
गंगाखेड प्रतिनिधी रामप्रसाद ओझा : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या गंगाखेड तालुका शाखेची मासिक बैठक शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. तालुकाध्यक्ष शेख महेमूद यांच्या आयोजनाखाली झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल साळवे होते.बैठकीचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष राहुल साबणे यांनी केले. युवा पत्रकार व प्रसिद्धीप्रमुख प्रेम …
Read More »श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील दोन विद्यार्थ्यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड
परभणी,दि 17 ः परभणी येथील म. शी.प्र मंडळ संचलित श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील संगणक विभागाचे दोन विद्यार्थी देवश्री आनंद पाथरीकर व रघुराज सातोणकर यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा ही पुणे येथील ए एस एम (ASM) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये रविवार दिनांक 11/10/ 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे” …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com