19/10/26
Breaking News

नारायण सुर्वे यांच्या कवितेतून शोषित वर्गाच्या जीवनाचे चित्रण ………प्रा.डाॅ. आशा गिरी.

सेलू,दि 18 (प्रतिनिधी):
नारायण सुर्वे यांच्या कवितेत शोषित,कष्टकरी, समाजासह शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी लेखणी चालवली. नारायण सुर्वे यांनी आपले आयुष्य कामगारांच्या हक्कांसाठी जगले.आपले जीवन कसे जगावे किंवा व्यतीत व्हावे हा प्रत्येकाचा वेगळा स्थायीभाव आहे,परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्य वेचले तर त्याचे समाजात शेवटपर्यंत नांव व काम राहाते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कविता आणि नारायण सुर्वे म्हणजे एक समीकरण झाल्याचे त्यांच्या शब्दातून पाहायला मिळते.कविता शब्दांकित करण्याची प्रतिभा प्रगल्भ आणि वैचारिक दृष्टिकोन ठेवून त्या कवितेत कष्टकऱ्यांची जीवनशैली शब्दबध्द होत असते. (ता १७) शनिवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘एक दिवस, एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत ४५ वे पुष्प गुंफताना प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डाॅ.आशा गिरी बोलत होत्या.
‘नारायण सुर्वे यांची कविता’ या पुस्तकावर बोलताना डॉ.सुरेश हिवाळे म्हणाले,की नारायण सुर्वे यांनी आपली लेखणी ही कायम कष्टकरी,कामगार आणि शोषितांच्या जीवनाचे वास्तव मांडण्यासाठी चालवली. सुर्वे यांच्या लेखणीतून चौफेर आणि सकारात्मक विचारसरणी वाचायला मिळते असे ते म्हणाले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा सप्ताहाचे आयोजन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले होते.त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले,यात खुले कवी संमेलन,सामान्य ज्ञान,वक्तृत्व स्पर्धा,शब्द संपदा स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सप्ताहात सेलूतील यासेर उर्दू इंग्लिश प्राइमरी स्कूल व हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भेट देऊन वाचन संस्कार याविषयी महत्त्व जाणून घेतले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जावेद पठाण ,अन्सारी शेख, शेख नजमा यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
या विविध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.अनंत मोगल,प्रा.विनायक शिंदे, प्रा.डॉ.दादासाहेब बोंबले, नारायण चौरे,माधव गव्हाणे,आम्रपाली खाजेकर,धनश्री देशमुख ,पांडुरंग पाटणकर, अमोल बिडवे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर तर आभार डॉ.शरद ठाकर यांनी मानले. प्रमाणपत्र यादी वाचन अमोल बिडवे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित जगाडे , दिगंबर खुळे,बद्रिनारायण शिंदे, सुयोग साळवे, यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी पुढील मान्यवरांची उपस्थिती होती.अनुजा कोल्हाळ, भक्ती पितळे, संध्या फाटे, प्रिती तनपुरे,अक्षरा पवार,प्रांजल काकडे, गजानन शितोळे , भारत गाडेकर, डॉ. वसंत पांचाळ , डॉ .आत्माराम पुरी परभणी, दत्तात्रय माकोडे, प्रा.के.डी. वाघमारे, प्रकाश धामणगावकर, बालाजी शेरे, सिद्धेश्वर मुरकुटे, डॉ.राजाराम झोडगे, विजय ढाकणे, यशपाल काकडे , हुमेरा मुनवर शेख, अंबादास मरळ, हरिहर खिरे, एकनाथ करपे , केशव टाकळकर ,वैभव संगई ,हरिभाऊ मोगल, शेख जलील शेख इब्राहिम, सर्जेराव लहाने, गजानन उफाड , मनिष गिरी, शशिकांत मालशेटवार, इत्यादी उपस्थित होते.

Check Also

सेलू येथील मुंजाबा महाराज मंदिर कामकाज बांधकामाचे पूजन

सेलू( प्रतिनिधी ) येथील सेलू परभणी रोडवरील न प च्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळ असलेल्या अत्यंत …