गंगाखेड प्रतिनिधी रामप्रसाद ओझा :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या गंगाखेड तालुका शाखेची मासिक बैठक शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.
तालुकाध्यक्ष शेख महेमूद यांच्या आयोजनाखाली झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल साळवे होते.बैठकीचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष राहुल साबणे यांनी केले. युवा पत्रकार व प्रसिद्धीप्रमुख प्रेम सावंत यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या नियोजित उपक्रमांचा आढावा मांडला. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा ग्रामीण भागातील गल्लीबोळापर्यंत विस्तार करण्याचा मानस ज्येष्ठ पत्रकार तथा कार्याध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य सय्यद गौस, तालुका संघटक अतुल कलकोटे, सहसचिव राम पवार, मार्गदर्शक ज्ञानोबा कदम, सल्लागार ॲड. राजू देशमुख, सदस्य शेख नसीरुद्दीन, गोपाळकृष्ण पाळवदे, निलेश भिसे आदी उपस्थित होते. तालुका संघटक अतुल कलकोटे यांनी आभार मानले.
Shabdraj www.shabdraj.com