कळमनुरी,दि 18 (प्रतिनिधी) ः
येथील वीरशैव दुर्गामहोत्सवानिमित् उपनगराध्यक्ष शिवराज पाटील चौधरी व संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कवी महादेव ढोणे यांच्या बहारदार सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत आली. या स्पर्धेला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक सौ. कोमल चंद्रकांत चौधरी-पाटील यांनी पटकावले. द्वितीय पारितोषिक पूजा परमेश्वर स्वामी, तर तृतीय पारितोषिक सौ. स्नेहल विशाल मोहोळे यांनी जिंकले. तिन्ही विजेत्यांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय उपस्थित महिला प्रेक्षकांमधून २५ भाग्यवान महिलांची निवड करून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाला आर. आर. पाटील, राजूभाऊ पटणे, संजय कापसे, कुलभूषण बुरसे, विलास शिंदे, विश्वनाथ चौधरी, बबलूभाऊ पत्की, संतोष साखरे, सूरज साखरे, ऋषिकेश चौधरी, गुड्डू शिंदे, विशाल शिंदे, पींटु गडदे, रवी सोवीतकर, यांच्यासह सुवर्णाताई गाभणे यांची उपस्थिती होती.
वीरशैव दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे उत्सवात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष सोडेगावकर यांनी केले
शिवराज पाटील यांनी होम मिनिस्टर स्पर्धाच्या माध्यमातुन महिलांमध्ये कलागुणांना वाव देण्याचे काम केले.
उपनगराध्यक्ष शिवराज पाटील चौधरी यांनी वीरशैव दुर्गा महोत्सव येथे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करून महिलांमधील कलागुणांना वाव देण्याचे काम केले आहे त्यामुळे परिसरातील आम्ही सर्व महिला आनंदी आहोत – सौ मोहळे
Shabdraj www.shabdraj.com