परभणी ता.27
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी शनिवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते व महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपले पशुधन, धान्य व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. नदी, नाले व पूरग्रस्त रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. शहरी भागात पाणी साचल्यास तातडीने नगरपालिका किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
जिल्हा प्रशासन, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत सज्ज असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com