सेलू / प्रतिनिधी – सर्व जण दिवाळीचा आनंद घेत असतानाच नगर परिषद मधील सफाई कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जपत सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी आज नगर परिषदेतील पुरुष कर्मचार्यांना ड्रेस व फराळ तर महिला कर्मचाऱ्यांना साडी व फराळाचे वाटप केले .यावेळी जवळपास २०० सफाई कामगार उपस्थित होते .
येथील नगर परिषदेच्या स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी विमल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा यश डेव्हलपर्स व प्रॉपर्टी ब्रोकर योगेश सुधाकरराव कुलकर्णी ,माजी नगरसेवक विनोद तरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी मनोगतात पवन आडळकर व योगेश कुलकर्णी यानी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .
Shabdraj www.shabdraj.com