24/03/26
Breaking News

मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते सेवानिवृत्त,कर्मचाऱ्यांनी केला सत्कार

परभणी,दि 30 (बातमीदार)ः
परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. प्रभाकर काळदाते हे नियत वयोमानाने दिनांक 30.09.2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. प्रभाकर काळदाते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. प्रभाकर काळदाते, प्र. उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, संघटनेचे के.के. आंधळे, वसंत देशमुख, विलास भुसारे, पंकज देशमुख,नासेर खान, अभिजित कुलकर्णी, आस्थापना प्रमुख शिवाजी सरनाईक, क्रिडा व सांस्कृतीक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, अल्केश देशमुख मनोज तळेकर, बाळासाहेब भागवत, उमेश जाधव देशमुख, शेख महेमुद आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …