पुर्णा,दि 29 ः
28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीच्या वर्गातील शिवप्रसाद बिरंगने या विद्यार्थ्याने भूषवले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वराज धुराजी ढगे याने केले. तर संविधान साळवे, रत्नदीप नरवाडे, लंकेश आटकोरे,सतीश लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशराज घोडके यांनी केले तर आभार समर्थ बळवदे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक शामसुंदर निरस यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.कार्यक्रमासाठी शाळेतील कर्मचारी श्री राहुल साखरे, काशिनाथ गणगे, श्रीमती कीर्ती जोंधळे,संगीता शिरसे, मनीषा जोंधळे, रुपेश जाधव यांच्या सह शाळेतील सर्व विद्यार्थी, बीव्हीजी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com