परभणी,दि 25 ः
श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशनुसार राज्यभरात “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत “एक दिन, एक घंटा,एक साथ” हे एक तासाचे अभियान महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करून यशस्वी पार पडले,हा संकल्प पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. आर. बी . देशमुख व प्रा.डॉ. ए. आर. देशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील उपक्रमाकरिता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. श्री. प्रकाश दादा सोळंके, सचिव मा. आ. श्री. सतीश भाऊ चव्हाण तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.श्री. चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री. मगदूम मोहीउद्दीन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दीपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे, मा. श्री. संतोष इंगळे आदींनी शुभेच्छा दिल्या.
Shabdraj www.shabdraj.com