17/07/26
Breaking News

न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी विरुद्ध तक्रार

सेलू दि २८ ( प्रतिनिधी )
सर्व्हे नंबर मध्ये समाविष्ट सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमीन मोजणी करण्या बाबत तालूका सत्र न्यायालयाचे आदेश असताना ते डावलून तालूका भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेख व कटारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मौजे डीग्रस (बु) ता. सेलू येथील गट क्रमांक ७६ मधिल शेत जमीन गैर मार्गाचा अवलंब करून मोजणी केल्या बाबतची तक्रार उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या कडे शेतकरी शिवनारायण रामपाल मालाणी यांनी ॲड.के.एस. जोशी यांच्या मार्फत दिनांत २५ मे रोजी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की मौजे डिग्रस (बु) ता सेलू मधिक गट क्रमांक 76 मध्ये तक्रारदार यांची ४ एकर ३६ गुंठे जमीन आहे. तसेच वादी वैजनाथ बाबुराव शेळके व इतर सदस्याच्या जमीनी असून त्यांनी जमीन व प्लॉट विक्री केल्या आहेत. वादी व भाऊबंदांनी संगनमत करून सर्व जमीन धारकांना विचारात न घेता दिवाणी दावा दाखल केला परंतू या बाबत सेलू दिवाणी सत्र न्यायालयाने सर्व लोकांना नोटीस देऊन १३ हेक्टर ७४ आर एवढया जमिनीची मोजणी करण्याचे आदेश वादी वैजनाथ शेळके यांना दिले .
परंतू न्यायालयाचे आदेश डावलून जाणीव पूर्वक ७/१२ वरील कोणत्याही शेतकऱ्यास नोटीस न देता व जमीन मोजणीच्या वेळी कोणताही हिस्सेदार शेतकरी उपस्थित नसताना भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून वादीने स्वतःच्या मना प्रमाणे खोटा मोजनी अहवाल व नकाशा तयार करून घेतला.भूमि अभिलेख कार्यालयाची दिशाभूल केली तसेच महसूल संहितेच्या कलमांचे उल्लंघन केले आहे म्हणून भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेख व कटारे यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी , जमीण मोजणी चा तयार केलेला खोटा अहवाल व नकाशा रद्द करण्यात यावा, जमीनीची फेर मोजणी गटातील सर्व हिस्सेदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात यावी , सहधारकांच्या हिस्या प्रमाणे मोजणी अहवाल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …