04/02/26
Breaking News

आडगाव येथे जास्तीची जमिन दाखवुन शासनाची फसवणुक केल्याची तक्रार

वसमत,ता 22 ः
वसमत तालुक्यातील आडगाव येथे एकाने नऊ एकर पाच गुंठे जमिनीची कागदोपत्री नोंद दाखवत पीक कर्जासह इतर शासकीय अनुदान उचलून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.दोन गटाची फोड करुन क्षेत्र कमी न केल्याचा लाभ उठवत हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

 

आडगाव रंजे  येथील गट नंबर 587/01 आणि587/02न यामध्ये पांडुरंग मुंजाजी चव्हाण यांची  शेती असून भूमी अभिलेख कार्यालयातून प्राप्त नकल व मूळ मालक मुंजाजी व्‍यंकटी चव्हाण यांच्या नावाने सर्वे नंबर 162 क्षेत्रफळ चार हेक्टर पाच आर आणि त्याचा मूळ गट नंबर 587 हा आहे गट क्रमांक 587 ची दोन गट करण्यात आले असून गट क्रमांक 587 एक आणि गट क्रमांक 587 दोन झाले असताना सदरील गटामधील क्षेत्र कमी न करता दोन्ही गटात चार हेक्टर पाच आर एवढे क्षेत्र ठेवण्यात आले आहे.मुळ जमिन मालकाने विक्री केलेली जमिन कमी न करता ही बनवाबनवी केल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्याला केवळ 3 हेक्टरच जमिन असतानाही दुसरी चार हेक्टर जमीन दुसऱ्या गटात दाखवून या शेतकऱ्याने आतापर्यंत शासनाकडून येणारे अनुदान पीक विमा व पीक कर्ज घेऊन शासनाची फसवणूक  केली आहे त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करावी,महसुल प्रशासनाने योग्य नोंदी घ्याव्यात  अशी मागणी शेतकरी कैलास चव्हाण यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …