12/12/25
Breaking News

सेलूत पालीकेच्या कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार

सेलू( प्रतिनिधी )
सेलू नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व चारा पाण्या अभावी आपली कोंडवाड्यातील गाय मरण पावल्याची तक्रार रामेश्वर नारायण बरडे यांनी दिली आहे.

सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे .त्यामध्ये दि ३ /११/२५ रोजी रामेश्वर नारायण बरडे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती .हे समजताच बरडे यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरून घेण्याची विनंती केली .
परंतु नगर परिषद मधील संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पावती बुक नाही असे सांगून दंड भरून घेण्यास चालढकल केली . व गाय देखील बरडे यांच्या ताब्यात दिली नाही .
दिब५/११/२५ रोजी सदरील गाय कोंडवाड्यातच मरण पावल्याची माहिती बरडे यांना मिळाली.
नगर परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व हलगर्जी पणामुळेच आपली गाय मरण पावली व तिच्यास मृत्यूस संबंधित कर्मचारीच जबाबदार असल्यासची तक्रार बरडे यांनी केली आहे .
गाईच्या मृत्यूमुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सदरील प्रकरणी दोषी विरोधात त्वरित योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी बरडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

Check Also

स्वराज्य ट्रेकर्सची साल्हेर-मुल्हेर-मोरा-हरगड गिर्यारोहण मोहीम यशस्वी

परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, …