परभणी,दि 24 ः
परभणी येथील म. शी प्र मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये दि. 20 जून रोजी कंत्राटदारासाठी काँक्रीट प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, परभणीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत श्री सिमेंट कंपनीतील स्थानिक कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक व साइट सुपरवायझर यांच्यासाठी काँक्रीट प्रयोगशाळा भेट व विविध बांधकाम साहित्य चाचण्यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदरील संस्थेचे प्राचार्य डॉ. शाहिद ठेकीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विभाग प्रमुख प्रा. अमोल बेंडसुरे, प्रा. प्रदीप रणखांब व प्राध्यापक आमिर अन्सारी यांनी काँक्रीट प्रयोगशाळेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सिमेंट, वाळू व काँक्रीटच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेतील आधुनिक उपकरणांची माहिती देण्यात आली असून विविध चाचण्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यामध्ये सिमेंटची स्टँडर्ड कन्सिस्टन्सी चाचणी, वाळूची सिल्ट कंटेंट चाचणी, सिमेंटची प्रारंभिक व अंतिम सेटिंग वेळ चाचणी तसेच काँक्रीटची स्लम्प कोन चाचणी यांचा समावेश केला गेला. बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करणे व वैज्ञानिक पद्धतीने साहित्य परीक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.या उपक्रमाचा लाभ स्थानिक कंत्राटदार व बांधकाम क्षेत्रातील संबंधितांनी यशस्वीरित्या घेतला.

Shabdraj www.shabdraj.com