परभणी,दि 29 (प्रतिनिधी):- श्रीमंत छत्रपती महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक सोहळा उत्साहानिमित्त परभणी तालुका प्रतिनिधी म्हणून विष्णु सायगुंडे यांची निवड करण्यात आली आहे.
वाफेगाव (या.खेड, जिल्हा पुणे) पुणे येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी दि.६ जानेवारी २६ रोजी सकाळी ११:०० वा. किल्ले वाफेगाव येथे श्रीमंत छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येतो,त्याच अनुषंगाने या ही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्त परभणी तालुका प्रतिनिधी म्हणून येथील पत्रकार तथा मल्हार ब्रिगेड,यशवंत प्रतिष्ठान व मल्हारराव होळकर व्यायाम शाळा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ चे अध्यक्ष विष्णु सायगुंडे यांची निवड महाराज भुषनसिंह होळकर यांनी निवड केली आहे. या राज्याभिषेक सोहळ्यात आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे हि आहवान परभणी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
Shabdraj www.shabdraj.com