सेलु,ता 31 ः
तालुक्यातील डासाळा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत एका ५०वर्षीय महिलेने आपल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची विड्रॉल बँकेत दिली परंतु या महिलेच्या मोबाईलवर दहा हजार रुपये काढल्याचा आलेल्या मेसेजने हे उघड झाले. तर याच बँकेमध्ये ३३ वर्षीय एका ग्राहकांना डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्याच सेलू येथील सेलू बडोदा बँकेत केलेले विस हजार रुपयाचे आरटीजीएस दुसऱ्याच इसमाच्या नावे थेट भारतीय स्टेट बँकेच्या सेलू शाखेत पोहोचले. हे दोन्ही प्रकार ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर सिद्धेश्वर रमेशराव गजमल व कैलास रमेशराव गजमल यांनी घडल्या प्रकाराबद्दल लेखी तक्रार सेलू मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक व सहाय्यक निबंधक कार्यालय सेलू यांच्याकडे २९व ३० ऑक्टोबर रोजी दिली असून डासाळा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक संगमेश्वर कुबे यांची चौकशी करून रक्कम पुन्हा जशी घेतली तशीच परत करण्याची मागणी केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती याप्रमाणे तालुक्यातील डासाळा येथील मध्यवर्ती बँकेत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या रकमेचा अपहार करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात शाखा व्यवस्थापकाच्या या प्रकाराबद्दल कोणीही पुढे येत नव्हते. परंतु या प्रकरणी महिला ग्राहक शिला रमेशराव गजमल वय ५० वर्षे या महिलेने आपल्या खात्यातून १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व २० ऑक्टोंबर रोजी कैलास रमेशराव गजमल वय ३३ वर्षे यांची रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिला रमेशराव गजमल यांनी १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या खात्यातून एक हजार रुपये भरलेली विड्रॉल दिली परंतु त्यांच्या खात्यातून दहा हजार रुपये विड्रॉल मध्ये खाडाखोड करून काढण्यात आले. तसेच २० ऑक्टोबर रोजी कैलास रमेशराव गजमल यांनी डासाळा मध्यवर्ती बँकेतून त्यांच्या नावे बडोदा बँक शाखा सेलू येथे करण्यात आलेले वीस हजार रुपयांचे आरटीजीएस त्यांच्या नावाऐवजी कागदपत्रे बदलून दुसऱ्याच खात्यावर भारतीय स्टेट बँक शाखा सेलू येथे रामेश्वर नामदेवराव गायकवाड यांच्या नावे करण्यात आले. या दोन्ही प्रकाराने एकच गदारोळ उडाला आहे.परंतु शाखाधिकारी संगमेश्वर कुबे जवाबदारी झटकत असून उलट बँकेच्या ग्राहकांना दमदाटी करत आहेत.म्हणून १४ ऑक्टोंबर रोजी घडलेल्या या प्रकाराबद्दल २९ व ३० ऑक्टोबर रोजी तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे किती ग्राहकांची या शाखेत फसवणूक झाली हे प्रत्येकाने आपल्या खात्याचा खाते उतारा घेतल्यानंतर कळेल. यामध्ये मध्यवर्ती बँकेत एफ डी आर, आवर्त ठेव मध्येही ग्राहकांच्या मनात असलेली रकमेची आफरातफरेची भीती खरी ठरते काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com