अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रभर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसाठी खास भेट जाहीर केली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतारचे तिकीट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरांपुरतीच मर्यादित असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रेक्षक आता फक्त 99 रुपयांत दशावतारचा आनंद लुटू शकणार आहेत. मात्र दुसरीकडे काही चाहत्यांनी तिकीट दर कमी करण्याला विरोध दर्शवला आहे. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने तो आणखी मोठी कमाई करू शकेल, त्यामुळे किंमत कमी करण्याची गरज नाही, असे त्यांचे मत आहे.
Shabdraj www.shabdraj.com