सेलू,दि 23 (प्रतिनिधी)
तालुक्यात जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर 25 या तिन्ही महिन्यात सातत्य पूर्ण पाऊस मुसळ धार पडत आहे,तालुक्यातील मंडळ मध्ये अतिवृष्टी,पडझड,ढगफुटी,ढगाळ वातावरणा मुळे सोयाबीन,कापूस,तूर,मूग,उडीद इत्यादी खरीप पिकाची पुरती वाट लागली आहे नदी,नाले,ओढे व ओढे काठची करोडो टन माती व पिके वाहून गेली आहेत अतिवृष्टी मुळे घराची पडझड झाली आहे गुरे,ढोरे पशुधन वाहून गेले आहे तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालें आहे त्या मुळे संपूर्ण तालूकयात अति वृ ष्टी झाल्या मुळे शेतीचे मशागती चे कामे ठप्प झाली आहे कीड व रोगाचा प्रादुर्भाव मुळे पिकाचे नुकसान झालें आहे शेतकरी आर्थिक संकटा मध्ये सापडला आहे त्या मुळे सेलू तालूका सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याची कर्ज माफी करण्यात यावी यावी असे निवेदन मध्ये म्हटले हे निवेदन मा.मुख्यमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यलयातील नायब तहसीलदार श्री नारायण पिंपळे यांच्या मार्फत देण्यात आले आहे या निवेदन वर सेलू तालूका काँग्रेस कमिटी चे तालूका अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर,कॉम्रेड उद्धवराव पौळ,,,कॉम्रेड रामकृष्ण शेरे,माजी नगरध्यक्ष श्री पवन आडळकर,विनोद तरटे,दतरावं आंधळे,कॉम्रेड दत्तू सिंग ठाकूर,माजी नगरसेवक श्री रहीम पठाण,मुश्ताक रब्बानी,बाळासाहेब जोगदंड,शेख दिलावर,शेख साजिद,नृसिह हरणे,अफजल ईशानी,सचिन राऊत,इरफान लाला,सुदर्शन शेरे,अतिख कुरेशी,मधुकर नाईकनवरे,दिगंबर पौळ च्या निवेदन वर स्वाक्षऱ्या आहेत
Shabdraj www.shabdraj.com