04/02/26
Breaking News

जिल्हा परिषदेत रंगला अधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत सोहळा

परभणी – दिनांक 22 जुलै
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्वेता यादव यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद कोल्हापूर येथे झाली. तसेच डॉ संदीप घोन्सीकर यांची परभणी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, अंकुश चव्हाण यांची उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर डॉ संजय पांचाळ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असून अधिकाऱ्यांचा निरोप आणि स्वागताचा सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात चांगलाच रंगला.

सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांच्या निरोप आणि स्वागत समारंभ सोहळ्याचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

यावेळी प्राचार्य श्वेता यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावत असताना आलेले चांगले अनुभव आणि राबविण्यात आलेले अभिनव उपक्रम याबद्दलची माहिती दिली.

तर सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू झालेले डॉ. संदीप घोन्सीकर यांनी ओमप्रकाश यादव यांनी केलेल्या कामांचे कौतुक करून येणाऱ्या काळात आपल्या कार्या बाबत समयोचित मार्गदर्शन केले. तसेच आपण देखील जिल्ह्यातील खेडोपाडी जाऊन शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे नियोजन परभणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषद सेवा निवृत्त सेवा संघ जिल्हा शाखा परभणी तालुका शाखा गंगाखेड, परभणी यांच्या वतीने देखील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज कानांवर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ओमप्रकाश यादव यांच्या कारकिर्दीत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. श्वेता यादव व ओमप्रकाश यादव यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
नतिशा माथूर
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …