पूर्णा,दि 04 ः
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे मागील ६ वर्षांपासून श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये ५०० पेक्षा जास्त पदवीधारक विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महाविद्यालयात ५ व्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजनाने व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील ७३ पेक्षा जास्त विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे डॉ.राजाराम सखाराम माने हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे
कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम,कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, सहसचिव गोविंदराव कदम, उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर, डॉ. शिवसांब कापसे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. संजय दळवी विदयार्थी कल्याणकक्षाचे डॉ. विजय पवार, परीक्षाधिकारी डॉ.राजू शेख यांची उपस्थिती होती. डॉ. राजाराम माने हे नामांकित शास्त्रज्ञ असून वेगवेगळ्या ३७ देशात त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी प्रवास केला आहे. डॉ. माने यांचे संशोधन क्षेत्रात नावंलौकिक असून त्यांना राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.राजाराम माने यांनी त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास विद्यार्थ्यासमोर व्यक्त केला. आई वडील शेतकरी असताना सुद्धा जिद्द व मेहनतीच्या जोरावर संशोधन कार्य केले. कामाप्रती असणारी श्रद्धा व आत्मीयता हे तुम्हाला तुमचे यश संपादन करण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांना अतिउच्च पदावर जायचा असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही. तुमचा कामाप्रती असणारा प्रामाणिकपणा तुम्हाला यशाची दारे उघडत असते.ज्या क्षेत्रात जायाचे तेथे प्रामाणिक कष्ट करा फार आनंद मिळेल. जग खूप सुंदर आहे.इतरांना तुम्ही आदर दिला तर त्याची परतफेड तुम्हाला चांगलीच मिळेल. तुम्ही किती जरी मोठे झालात तरी आई-वडिल, महाविद्यालय, संस्थेला कधी विसरू नका.
विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने मेहनत करीत यश संपादन करावे सोबतच ज्ञानधिष्ठीत समाज घडवण्यासाठी विदयार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करणे अत्यंत महत्वाचे आहे. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपलं अस नाही, इथून खऱ्या अर्थाने तुमच्या भविष्याच्या रोजगाराचा प्रवास सुरु झाला आहे. आजघडीला तुमच्या समोर मोठी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कामाप्रति सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण कष्ट करा यश निश्चित मिळेल. ग्रामीण भागातील गोर-गरीब विदयार्थ्याच्या आयुष्यात ज्ञानाची जोत लावण्याचे काम संस्था व संचालक मंडळ करीत असते शैक्षणिक विकासासाठी संचालक मंडळीचे फार मोठे योगदान आहे.त्यांच्या मदती शिवाय महाविद्यालयाचा विकास शक्य नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार करतांना म्हटले की, महाविद्यालय जरी ग्रामीण भागात असले तरी येथील विदयार्थी अनेक प्रशासकीय सेवेत, वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात कार्यरत असून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयाने केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळीच्या सहकार्य व पाठबळामुळे हा शैक्षणिक आलेख उंच जाण्यासाठी मदत झाली. अध्यक्षीय समारोप श्री गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षाधिकारी डॉ.राजू शेख यांनी विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी विज्ञान शाखेचे डॉ.बाळासाहेब मुसळे वाणिज्य शाखेचे डॉ.दिशा मोरे कला शाखेचे डॉ.वृषाली आंबटकर यांनी मान्यवाराच्या हस्ते प्रमाणपत्र घेण्यासाठी आमंत्रीत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ.राजू शेख यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Shabdraj www.shabdraj.com