04/02/26
Breaking News

ध्येयप्राप्तीसाठी स्वतः मधील कौशल्य विकसित करा – डॉ.अंकित मंत्री यांचे प्रतिपादन

सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार उत्साहात

सेलू – जीवनात आईवडील आणि शिक्षक यांचे नि:स्वार्थ प्रेम लाभत असते. याची कायम जाणीव ठेवा, त्यांच्या भावना कधीही दुखवू नका. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःमधील प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा आणि ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा परभणी येथील प्रसिद्ध अतिदक्षता आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकित अशोककुमारजी मंत्री यांनी केले.

सेलू येथील नूतन विद्यालयातील शालांत परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक शिष्यवृत्ती परीक्षा, एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड, शासकीय बाल चित्रकला परीक्षा, तसेच राष्ट्रीय खेळाडू आदी दोनशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी प्रमुख पाहुणे डॉ.अंकित मंत्री यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया होते. याप्रसंगी सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयदत्त बावणे यांची उपस्थिती होती. या वेळी शिक्षणप्रेमी नागरिकांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या संस्था गुणवत्ता पारितोषिक, पालक शिक्षक संघ तसेच जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

 

शिक्षक अशोक लिंबेकर यांनी डॉ.अंकित मंत्री या आपल्या विद्यार्थ्याप्रती भावना व्यक्त केल्या. गोपाळ आम्ले यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन शिल्पा बरडे, यादी वाचन रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, सुनील तोडकर, राजेंद्र सोनवणे यांनी केले तर संभाजी रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर; तसेच स्मिता मंत्री, पुष्पादेवी मंत्री, प्रकाश पांडव, विजय मंत्री, प्रभुदयाल मंत्री, नारायण इक्कर आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

 

फोटो ओळी : सेलू येथील नूतन विद्यालयातील गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.अंकित अशोककुमार मंत्री यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ.एस.एम.लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …