14/02/26
Breaking News

पाथरीत माजी.आ बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृवात धडक मोर्चा

पाथरी,दि 29
पाथरी नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातील नागरिकांनी मंगळवारी धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला.
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा त्यांच्या निवासस्थानापासून निघून चौक बाजार, सेंट्रल नाका या मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला. यावेळी मोर्चेकरांच्या हातामध्ये विविध मागण्यांचे फलक होते. हलगी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. मोर्चा दरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई, शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य, घरकुल योजनेतील हप्ते न मिळणे, रस्त्यावरील खड्डे, नगर परिषदेमार्फत होणाऱ्या सेवांचा दिरंगाई कारभार आदीबाबत आवाज उठवला. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. राजेश घोडे, सुभाष आबा कोल्हे, संतोष देशमुख, दत्तराव मायंदळे, मुजाहिद खान, डॉ.राजेंद्र चौधरी, जुनेद खान दुर्राणी, नारायणराव आढाव शेख मुस्तफा,मुखीद सेठ  जहागीरदार,सुनील उन्हाळे,राजीव पामे, शेख खुर्शीद आदी उपस्थित होते.
15 तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दुर्राणी यांनी दिला.

Check Also

गाई व गोवंश चोरून नेणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची मागणी

सेलू / प्रतिनिधी – सेलू व परिसरामध्ये गाई चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. सेलू शहरातून …