गंगाखेड,दि 19
येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयातील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी पत्रकार महेमुद शेख यांचा मुलगा शेख अफान महेमुद याला उत्कृष्ट शिस्त,वेळपालन आणि आदर्श वर्तनाबद्दल “शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. (दिनांक 19 नोव्हेंबर बुधवार) रोजी शाळेत आयोजित विशेष समारंभात मुख्याध्यापक तुकाराम कांगने,वर्गशिक्षक सूर्यकांत बडवणे यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला.
शिस्तप्रिय विद्यार्थी पुरस्कार दैनिक अभ्यास करून वर्गकार्यात अग्रेसर राहणाऱ्या विद्यार्थ्याला स्वच्छता शिस्त आणि अभ्यास आणि वयक्तिक स्वच्छता बाळगणाऱ्यास पुरस्कार दिला जातो.गत शैक्षणिक वर्षभर अफान याने शाळेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले, वेळेची शिस्त,स्वच्छता,अभ्यासातील सातत्य वाचन तसेच स्वाध्यायामध्ये व शिक्षकांशी नम्र आणि आदर्श वागणूक यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. त्याने विविध उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत शाळेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे पालक म्हणून पत्रकार महेमुद शेख व त्यांच्या पत्नी माहीन शेख यांनी संगोपन केले आहे असे वर्गशिक्षक सूर्यकांत बडवणे यांनी स्पष्ट केले.पुरस्कार स्वीकारताना अफानने शाळेचे मुख्याध्यापक,वर्ग शिक्षक,पालक व मित्रमंडळींचे आभार मानले.
.शाळेचे सचिव दीपक तापडिया शाळेतील शिक्षक दत्ता भंडारवाड,गिरीश करंडे,लक्ष्मीकांत कोल्हे,सूर्यकांत बडवणे, शिक्षिका श्रीमती कोमल आचार्य,लक्ष्मी मुधोळकर,रेखा गायकवाड,रूपाली वट्टमवार,रेखा कनकदंडे,दिपांजली मुंढे,अश्विनी देवळे,निलावती चोरघडे आदींनी अफानचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com