12/12/25
Breaking News

कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप

रमेश बिजुले
पाथरी,दि 30 ः
पाथरी तालुक्यातील कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप करण्यात आले व सर्व शिक्षण अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश बूट सॉकस वाटप करण्यात आले दिनांक 30 जुलै 2025 रोजी प्रा शा कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय कानसुर यांच्या वतीने*इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगschool bag चे वाटप करण्यात आले* व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक गणवेश , एक जोड बूट व दोन जोडी सॉक्स चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावच्या सरपंच सौ. कुसुम बालासाहेब हिवरकर श्री संदीप बालासाहेब शिंदे, श्री. आडसकर साहेब (ग्रामसेवक) श्री.अंकुश रामभाऊ शिंदे (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष)श्री.गणेश शिंदे श्री.मुकुंद शिंदे मुख्याध्यापक श्याम चव्हाण गावातील नागरिक,पालक शाळेतील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित उप होते

Check Also

स्वराज्य ट्रेकर्सची साल्हेर-मुल्हेर-मोरा-हरगड गिर्यारोहण मोहीम यशस्वी

परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, …