परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खून प्रकरणातील सूत्रधार शोधावा, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेने बुधवारी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दाभोळकर यांच्या निर्घृन खूनास 12 वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु, खूनामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहे. शासन स्तरावर त्या सूत्रधारांना पकडण्याकरीता कोणत्याही हालचाली सुरु नाहीत, अशी खंत या समितीचे डॉ. सुनील जाधव, प्रल्हाद मोरे, अॅड.यशवंत कसबे, मुंजाजी कांबळे, चंद्रकांत गांगुर्डे, माणिक लिंगायत, मुखीद खान, डॉ. जगदीश नाईक आदींनी या निवेदनातून व्यक्त केली.
Shabdraj www.shabdraj.com