मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ई-केवायसीची माहिती देताना सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
महिला व बालविकास विभागाने काढले परिपत्रक
दुसरीकडे, महिला व बालविकास विभागाने यासंबंधीचे एक परिपत्रकही काढले आहे. आधार कायद्यातील तरतुदींनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता विभागामार्फत ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी व प्रमाणीकरण केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते.
खाली वाचा कशी करायची e-KYC?
- ई केवायसी करण्यासाठी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
- वरील पोर्टलवर गेल्यानंतर महिलांना प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.
- आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा लागेल.
- हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
- आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.
- त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा.
- अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला 1) माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्तीवेतनाचा लाभ घेत नाही, 2) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
Shabdraj www.shabdraj.com