परभणी,दि 26 ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या.
मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्या बिया जमिनीत जाऊन झाड तयार होईल. सदरील उपक्रमात एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुर्त्या बनवल्या. या उपक्रमात प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांस बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदरील गणपतीचे विसर्जन घरातील कुंडीत करण्यात येणार असल्याने त्या कुंडीत बियांपासून रोपं तयार होतील. परंपरेने तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्ती ह्या पर्यावरणास घातक असतात. परंतु मातीपासून तयार केलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असतात. पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा या घोषवाक्याने या उपक्रमाची सार्थकता सिद्ध होते अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्य प्रा.नारायण राऊत, पर्यवेक्षक प्रा. संजय ढवळे तसेच डॉ.बापूसाहेब भोसले यांची उपस्थिती होती.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजेश म्हस्के प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा. रामप्रसाद देशमुख, प्रा. नितीन चौधरी, प्रा. शैलेंद्र पखाले, प्रा. गिरीष देशमुख, प्रा. चद्रकांत ढेपे, परिक्षक प्रा. माया रोडगे, प्रा वैशाली वसमतकर प्रा.कदम, प्रा. शारदा सुरवसे आदींनी पुढाकार घेतला.
Shabdraj www.shabdraj.com