04/02/26
Breaking News

गौर येथील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

पूर्णा / प्रतिनिधी – एक पेड माँ के नाम या उपक्रमात सहभागी होऊन शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी रोपटे लागवड करून फोटो अपलोड करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक परभणी सविता बिरगे यांनी केले.

 

गौर येथील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा तपासणी भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी सविता बिरगे मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक अच्युत जोगदंड, सतिश गोरे, भिमराव ढगे, वैजनाथ पारवे, मंगेश पारवे, पंकज मिठ्ठेवाड, रंजना शिवणकर, कामाक्षी साकोळकर, मेघा पारवे आदींची उपस्थिती होती.

 

श्री सोमेश्वर विद्यालय ग्रामीण भागात निसर्गरम्य गुणवत्ता पूर्ण शाळा असल्याचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी मार्गदर्शनात बोलून दाखवले.शाळा तपासणी मध्ये विविध विभाग तंबाखू मुक्त परिसर, हरीतसेना, विशाखा समिती, रेड रिबीन क्लब, माता पालक समिती, तक्रार पेटी, शालेय पोषण आहार, वृक्ष लागवड आदी बाबत अहवाल तपासले, प्रत्येक वर्गाची डोके मोजणी करून सर्व विद्यार्थी यांच्या अडचणी सोविसुविधा बाबत प्रश्न विचारून सूचना करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख नवनाथ बोबडे यांनी केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …