गंगाखेड,दि 19
येथील नगर परिषद निवडणूक निमीत्त बुधवारी (दि.19) रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन इमारत येथे निवडणूक तयारी संदर्भातील बैठक पार पडली.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठकघेण्यात आली.या बैठकीला क्षेत्रीय अधिकारी क्रमांक १०, रूट गाईड १३, B.L.O, FST, VST तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विविध पथकांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेण्यात आला तसेच निवडणूक नियोजन, प्रोटोकॉल आणि अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून EVM मशीन (CU–72 व BU–144) प्राप्त झाले असून उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे FLC प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षपदासाठी १८ अर्ज, १४ वैध
नगर परिषद निवडणूक २०२५ करिता नगराध्यक्ष पदासाठी एकूण १८ नावनिर्देशनपत्रे दाखल झाली असून त्यापैकी १४ वैध तर ४ अवैध ठरले आहेत.सदस्य पदासाठी १३ प्रभागांकरीता एकूण २०८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८३ वैध तर २५ अवैध घोषित करण्यात आले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com