सेलू ( प्रतिनिधी )
सेलू शहरात सध्या विजेच्या मीटर चे बिल जास्त आल्याच्या तक्रारी वाढत असून वीज ग्राहकांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत .यामुळे ग्राहकाच्या प्रचंड नाराजी पसरत असून लवकरच यासाठी आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते .
शहरात सध्या मीटर रिडींग चे काम एका खाजगी कंपनीला दिल्यागेले असून त्यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज ग्राहकांची मीटर रीडिंग घेऊन ती महावितरण कार्यालयात देतात .व त्यानुसार ग्राहकांना वीज बिल वितरित केले जातात.
परंतु सध्या वीज बिलात होत असलेली प्रचंड वाढ हा चर्चेचा विषय बनत असून वीज ग्राहकात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरत आहे .आपले बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांना महावितरणच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत .
तिथे बिल दुरुस्ती साठी गेल्यानंतर आपले मीटर नादुरुस्त आहे .व त्यावर ची रिडींग स्पष्ट दिसत नाही. असे कारण सांगण्यात येत आहे .
परंतु हा सर्व घोळ मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे समजते .ते मीटर ची रिडींग जाणून बुजून बरोबर घेत नाहीत .व मग मीटर नादुरुस्त सांगून जास्तीचे वीजबिल ग्राहकांना दिली जात आहेत .अशी देखील सर्वत्र चर्चा आहे .
व मग मीटर बदलीसाठी ग्राहकांची अडवणूक करून पैसे उकळण्याचे देखील प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे .
वाढीव बिल दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
प्रत्यक्षात रिडींग घेणाऱ्या मंडळींच्या हलगर्जीपणा मुळे वीज ग्राहकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे .अवाच्या सवा बिले देऊन सर्व सामान्य जनतेची होणारी अडवणूक न थांबल्यास वीज ग्राहकाकडून लवकरच जन आंदोलन उभे करण्याची तयारी चालू आहे .
यामध्ये शहरात कांही एजंट देखील कार्यरत असल्याचे समजते .परंतु त्यांच्या पाठीशी नक्कीच एखादा अधिकारी असला पाहिजे .अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे .
तरी सदरील प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज ग्राहकांची होत असलेली अडवणूक दूर करावी अशी मागणी जोर धरीत आहे .
Shabdraj www.shabdraj.com