रमेश बिजुले
पाथरी,दि 02 ः
पाथरी शहराच्या इंदिरानगर आणि परिसरातील विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.विजेचा लपंडाव नेहमीचीच समस्या झाल्यामुळे इंदिरानगर येथील नागरिकांनी पाथरी महावितरण कार्यालय गाठत या समस्येपासून सुटका करण्यासाठी निवेदन दिले. लोकसंख्येच्या हिशेबाने कमी पावरच्या डीपी आणि क्षमतेपेक्षा जास्तीचे लोड यामुळे येथील ट्रांसफार्मर नेहमीच जळत असल्याचे सांगत यावर उपाययोजना म्हणून लोड विभागणी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.
इंदिरानगर येथील नागरिक असलेले आणि येथील लोकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच झटणारे सोहेल अहेमद अत्तार व शेख खालेद दादा यांनी उपविभागीय अधिकाऱ्यासमोर सविस्तर व्यथा मांडल्यानंतर लवकरच उपायोजना करु असे उपलब्ध अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
या लेखी निवेदनावर माजी नगरसेवक अजयसिंह पाथरीकर,नसीब खान, आजीमुद्दीन तांबोळी, असलम शेख,नसीर बेग, भागवत कांबळे,लालूशेठ कैफ अन्सारी,बशीर खान, प्रमोद चाफे,भीमराव वैराळे, उत्तम भदर्गे,नदीम शेख,बाबा अत्तार,किशन कांबळे,खिझर फारोकी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com