04/02/26
Breaking News

शेतकऱ्यांच्या लेकी होणार सॉफ्टवेअर इंजिनिअर,श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

परभणी,दि 22 (प्रतिनिधी)ः
श्री शिवाजी महाविद्यालयातील बीसीएस्स संगणक शाखेच्या आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अग्रणी खाजगी कंपनीने प्रशिक्षण आणि नोकरीसाठी निवड केली आहे. यात शेतकरी वडील असलेल्या सहा मुलींचा समावेश आहे. या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सदरील कंपनीने महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. यात लेखी आणि तोंडी परिक्षांत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पायथन, टेस्टिंग, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डेटा सायन्सचे सखोल प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यात नियुक्ती देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सहा शेतकऱ्यांच्या लेकींचा समावेश आहे. घरी राहून बीसीएस्स सारखी पदवी पूर्ण करून हे यश मिळवले आहे. पुणे-मुंबई येथे न जाता सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे. या लेकीमध्ये गौरी भावले, मोहिनी आवचार, दिव्या कुरे, श्रेया कानडे, विद्या निलवर्ण, तनुजा कदम यांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये गोविंद ढगे आणि शिवाजी धामणे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ असून आयटी क्षेत्रात त्यांना परभणी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याची मोठी संधी मिळाली आहे असेही म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर,प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, प्रशिक्षण आणि रोजगार हमी विभागाचे प्रमुख प्रा.प्रशांत विभूते, संगणक विभागप्रमुख डॉ. वैभव पाठक, प्रा. अभिजित भंडारे, प्रा.संदीप सुर्वे यांनी अभिनंदन केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …