परभणी / प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गांचा अध्ययनस्तर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी / दहावी, मिशन स्कॉलरशिप, मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम राबविल्या जात आहेत. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी घेण्यात आली.
या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस व नवोदय परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांना सरावासाठी केलेल्या नियोजनानुसार दररोज जिल्हास्तराहून तालुकास्तरावर व तेथून शाळस्तरावर पाठ्यघटक पोहचवला जातो .यासाठी त्या त्या स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत दरमहा एक सराव चाचणी संपूर्ण जिल्हाभर घेतली जाते अशा स्वरूपाची शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी पाचवी चाचणी जिल्ह्यात घेण्यात आली.
या परीक्षेत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरून तयार झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिल्या जातात व लगेच त्याचा निकाल जाहीर करून त्यात असणारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविल्या जातात. यासाठी जिल्ह्यात एन एम एम एस व नवोदयसाठी यापूर्वी 4 चाचण्यांमध्ये प्रविष्ट झालेली संख्या सोबतच्या चार्ट नुसार आहे. यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास यांचे नेतृत्वात सर्व टीम सर्ववेळ कार्यरत आहे.
मिशन स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस सराव परीक्षा निकाल
प्रथम सराव परीक्षा नवोदय मध्ये 2695 तर एन एम एम एस मध्ये 1250 विद्यार्थी पात्र
द्वितीय सराव परीक्षा नवोदय मध्ये 8818 तर एन एम एम एस मध्ये 3324 विद्यार्थी पात्र
तृतीय सराव परीक्षा नवोदय मध्ये 9128 तर एन एम एम एस मध्ये 4246 विद्यार्थी पात्र
चौथी सराव परीक्षा नवोदय मध्ये 8068 तर एन एम एम एस मध्ये 4103 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com