स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या सन्मान माजी सैनिकांचा सत्कार
सेलू / प्रतिनिधी – डाॅ. अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गुलाबचंदजी गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान तसेच शहरातील माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम साईबाबा मंदिर सभागृहात करण्यात आला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डाॅ शिवाजीराव मगर पोलीस निरीक्षक दिपक बोरसे ,मुख्याधिकारी तुकाराम कदम,डाॅ अनुराग जोगदंड, सेवानिवृत्त अभियंता विलासराव पाटील, प्रा.के.डी वाघमारे,कॅप्टन जे.पी.शर्मा ,सेवानिवृत्त बॅंक अधिकारी पांडुरंग ढवळे,पत्रकार संघ अध्यक्ष लक्ष्मण बागल,अँड रामेश्वर शेवाळे, बॅक अधिकारी रामराव लाडाणे, महिला मंडळ सचिव ललीता गिल्डा, सुनील गायकवाड, विक्रांत पाटील, मधुकर पौळ,आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले .
पुंजाराम निर्वळ यांच्या हस्ते माजी सैनिक व शेतकरी यांचे पाद्य धुऊन सत्कार केला.
प्रास्ताविकात आयोजक सुनील गायकवाड म्हणाले की सेलूतील जेष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी भागीरथजी गेना यांचा सन्मान सोहळा हा आमच्यापिठीला प्रेरणादायी असून हा कार्यक्रम माझा एकट्याचा नसुन शहरातील दानशूर मित्रपरिवार व सहकार्यांचा आहे . नगर परिषद प्रशासनाने या शहरातील घडी टॉवर वरील बंद पडलेल्या घड्याळ त्वरित दुरुस्त करून द्यावे अन्यथा मी व माझे सहकारी उपोषण करणार.असा इशारा गायकवाड यांनी मनोगतात दिला .
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भागीरतजी गेना यांच्या शतकपूर्ती सोहळ्या निमित्त सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून के.डी वाघमारे यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप विलासराव पाटील यांनी केले.
माजी सैनिक रमेशराव काकडे यांनी सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केल तर विक्रांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कार्यक्रमाच्या यश्वतेसाठी, आयोजक विक्रांत पाटील, डाॅ अनिकेत जोगदंड, सुनील गायकवाड,पुजाराम निर्वळ,रामप्रसाद बोराडे, शुकाचार्य शिंदे,नागोराव देशमुख कृष्णा शेरे, किशोर भांडवले,सतिश जाधव,
सतिश आकात, सुशिल तोगरे ,प्रशांत ठाकूर, भगवान पावडे, काशिनाथ पल्लेवाड,मंजुषा कुळकर्णी,निर्मला लिपणे दासुपंत पितळे,चंद्रकांत गटकळ, शेख रसुल, आदिनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com