04/02/26
Breaking News

गजानन चव्हाणची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 12 
तालुक्यातील कोद्री येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी व कुस्तीपटू गजानन चव्हाण याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत परभणी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजाननचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औंढेकर, कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय सावंत, शिक्षक विलास राठोड, तसेच रुद्राक्ष इंग्लिश स्कूलचे संचालक व रुद्राक्ष जिम्नॅस्टिक क्लासेसचे संस्थापक धनराज मुंडे आणि कुस्ती प्रशिक्षक अभिमन्यू वानखेडे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

गजानन चव्हाण हा बालवयापासूनच कुस्तीप्रेमी असून त्याने तालुका, जिल्हा आणि विभागीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता तो राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, गोरखपूर येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …