07/11/26
Breaking News

सेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे

सेलू,दि 30 ःगटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांना सेलूच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.
उमेश राऊत यांची बदली झाल्याने गजानन वाघमारे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.गजानन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सेलूच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.कुठलीही फाईल न थकवता शिक्षकांना ते न्याय देतात.सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, प्राथमिक शिक्षण विभागात लहान मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी,परसबाग योजना यासह शासनाच्या योजना प्रभावीपणे सेलू तालुक्यात ते राबवतात.आता विस्तार अधिकारी सोबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार आल्याने गजानन वाघमारे यांना आणखी काम करण्यास संधी प्राप्त झाली असून त्यांना दिलेल्या पदभार बद्दल शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

दुष्काळ हा ना अस्मानी, ना सुलतानी, तो मानव निर्मित. – प्रसाद चिक्षे

मानवत (प्रतिनिधी) : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना पाण्याचा अमर्याद उपसा आणि निसर्गाचा ऱ्हास …