05/02/26
Breaking News

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गणेश गोरे सन्मानित

पूर्णा (प्रतिनिधी) – महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पूर्णा येथील ग्राम महसूल अधिकारी गणेश गोरे यांना महसूल दिनाच्या निमित्ताने दि.०१ ऑगस्ट रोजी गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मा.मेघनादीदी साखोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, प्रांताधिकारी धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. गणेश गोरे यांच्या कामगिरीची प्रशंसा करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …