रामप्रसाद ओझा
गंगाखेड,दि 01 ः
नगरपरिषदेतील मनमिळावू आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख असलेले वाहनचालक तथा अग्निशामक दल प्रमुख रामविलास बन्सीलाल खंडेलवाल हे (दिनांक ३१ ऑक्टोबर) रोजी नियमित वयानुसार ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले.
आपल्या दीर्घ सेवाकाळात खंडेलवाल यांनी नगरपरिषदेच्या विविध वाहनांवर चालक म्हणून जबाबदारीपूर्वक कार्य केले तसेच काही काळ स्वच्छता निरीक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. त्यांनी कार्यकाळात शिस्त, प्रामाणिकपणा आणि कार्यनिष्ठा यांचा उत्कृष्ट संगम घडवून सहकाऱ्यांमध्ये आपुलकी व आदराचे सबंध निर्माण केले.
सेवानिवृत्ती निमित्त नगरपरिषद कार्यालयात शुक्रवार रोजी एक भावनिक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी खंडेलवाल यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक कार्यक्षेत्रातले मान्यवर तसेच नगरपरिषद कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रमेश मणियार,सुरेश मणियार,पत्रकार गुणवंत कांबळे,पत्रकार महेमूद शेख, यांच्यासह नगर परिषदेचे सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी खंडेलवाल यांच्या सेवाभाव, कार्यनिष्ठा आणि मनमिळावूपणाचे कौतुक करत त्यांना दीर्घ,निरोगी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. चौकट:-बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर मावळा ते सेवानिवृत्त पालिका कर्मचारी सेवा देताना स्वच्छता निरीक्षक, अग्निशमन दलाच्या प्रमुख पदी यशस्वी कामगिरी बजावली व आज सेवा निवृत्त झाले.त्यांच्या स्तरातुन शुभेच्छा चार वर्षाव होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com