22/07/26
Breaking News

पाथरी नगर परिषदेची एकहाती सत्ता द्या, शहर पत्रेमुक्त करतो-सईद खान

पाथरी,दि 14 (प्रतिनिधी)ः
लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यामध्ये पाथरी नगरपरिषद ची सत्ता शिवसेनेच्या हाती द्या. माझ्या नेतृत्वात नगरसेवकांना काम करण्याची संधी द्या.मग पहा पाथरी शहराच्या अन्य विकासासह पाथरी शहराला घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल आणून पत्रेमुक्त घरे निर्माण करू.अशी ग्वाही शिवसेना नेते सईद खान यांनी आज इंदिरानगर येथे दिली.

यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष लालू खान,माजी नगरसेवक एजाज खान,अजय पाथरीकर,दीपक टेहरे,खालेद चाऊस,एल. आर कदम,खालेद दादा,मोहसीन खान,डॉ.वैराळ,सोहेल अहेमद आत्तार,असलम अत्तार,अजीमोद्दीन तांबोळी,मुबारक चाऊस,नसीर बेग,नसीब खान,असलम शेख,सोहेल मुबारक अत्तार,जावेद अत्तार,रोहिदास गवारे,भागवत कांबळे,शहेबाज कुरेशी इत्यादींची उपस्थिती होती सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त करत नगरपालिकेत शिवसेनेला भरघोस मते मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक खालेद दादा यांनी तर आभार खिजर फारोकी यांनी मानले. भविष्यात होऊ घातलेली पाथरी नगरपालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेवत सईद खान यांनी संपूर्ण पाथरी शहरातील प्रभागामध्ये निवडणूक नियोजन बैठकांचा धडाका लावला आहे.मागील दोन दिवसापासून जैतापूर मोहल्ला, माळीवाडा,आदर्श नगर, इंदिरानगर,जुना आठवडी बाजार, महबूब शहा फंक्शन हॉल,नामदेव नगर इत्यादी व अन्य सर्वच वार्डात ते अशा बैठका घेत आहेत.

Check Also

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील …