17/07/26
Breaking News

रावराजूर येथे योगसाधनेच्या साक्षीने गुणवंतांचा गौरव

पालम,दि 23 (प्रतिनिधी)ः
पालम तालुक्यातील रावराजूर येथे दिनांक २१ मे बुधवार रोजी गुरुवारच्या पहाटे पतंजली योग समिती व श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय तथा सनफ्लॉवर प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसीय योग शिबिराच्या २० व्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि योग शिक्षक व्यंकटराव शिंदे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात योगप्रेमींच्या उपस्थितीत योग वर्गाने झाली.त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालय रावराजूर येथून घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त गितांजली शिंदे (९२ टक्के), द्वितीय सरिता शिंदे (९० टक्के), तृतीय सृष्टी कदम (८७.२०टक्के) आणि चतुर्थ अयुब सय्यद (८६ टक्के) यांचा पुष्पगुच्छ व अभिनंदन करून गौरव करण्यात आला.यावेळी योग शिक्षक व्यंकटराव शिंदे यांचा वाढदिवसही आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.उपस्थितांनी वाढदिवस गीताच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमास शाम कवटकवार,विष्णुदास शिंदे, धनंजय शिंदे,संभाजी दुधाटे, गोविंद शिंदे,शाम शिंदे,अर्जून शिंदे,केशव शिंदे यांच्यासह योगप्रेमी,विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी प्रकाश डिकळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डिकळे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग कक्षा रावराजूर येथील सर्व साधक,विद्यार्थी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेत सहकार्य केले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …