04/02/26
Breaking News

पुन्हा सोने वाढले..पहा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळतो आहे. कधी या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होत आहे. तर कधी सोन्याचा भाव कमी होताना पाहायला मिळतोय. दरम्यान, आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 12 जानेवारी रोजी हाच भाव 1,42,150 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे

सोन्याच्या 100 ग्रॅमचा हिशोब करायचा झाला तर 12 जानेवारीच्या तुलनेत 13 जानेवारी रोजी हा भाव 3800 रुपयांनी वाढला आहे. 13 जानेवारी रोजी हा भाव 14,25,300 रुपये प्रति 100 ग्रॅम रुपये आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 14,21,500 प्रति 100 रुपये होता.22 कॅरेट सोन्याचा भाव 13 जानेवारी रोजी 1,30,650 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 1,30,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. मुंबईमध्ये 13 जानेवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 14,253 रुपयांवर पोहोचला आहे.

Check Also

अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! राज्यभरात सरकारविरोधात संताप

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. केवायसीमध्ये संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारण्यात …