23/08/26
Breaking News

शारदा महाविद्यालयात गोल्डन इंग्लिश क्लबची स्थापना

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात येते. यावर्षी ‘ गोल्डन इंग्लिश क्लब’ ची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष म्हणून कु. मंजुषा पिराजी वैद्य, उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर, सचिव कु. अंजली शिंदे, कोषाध्यक्ष विष्णू डहाळे, तसेच सदस्य म्हणून कु. सीमा क्षीरसागर, विशाल कुलदीपके, कु. अस्मिता मानवते, कु. रूपाली कोल्हेवाड, कु. गायत्री साळवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, प्रा. डॉ. सौ. वर्षा सूर्यवंशी व प्रा. ए. बी. टेकूळे हे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार, उप- प्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, प्रा. डॉ. प्रशांत मेने, प्रा. डॉ. संतोष नाकाडे, सुरेश जयपुरकर इत्यादींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …