सेलू ( प्रतिनिधी )
सर्व सामान्य माणसाची जीवनशैली सुखी व संपन्न होण्यासाठी सेवा करांच्या दराची पुनर्रचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटी च्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसांची जीवनशैली निश्चितच सुखी व संपन्न होणार आहे .असा विश्वास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला .
यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की .वस्तू व सेवा कराच्या दरात केलेली ही कपात म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा आहे .या।उले मागणी व उत्पादन वाढणार असल्याने निश्चितच रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत .व व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येणार आहे .यातून जीवनावश्यक वस्तू वरील कराचा बोजा हलका व नाहीसा होणार आहे .
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिल्यामुळे देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ २.०४ ट्रीलियन डॉलर्स पर्यंत पोहोचले होते .कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती .हे ओळखून मोदी सरकारने मजबूत अर्थव्यवस्था व आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले . देशातील जवळ्पास २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौध्या क्रमांकावर पोहोचली आहे .व लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे .असेही यावेळी बोर्डीकर यांनी सांगितले .
राज्यात सरकार कुणाचेही असले तरी या जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक कुटुंबाला ,गरिबांना व मध्यमवर्गीयांना तसेच लहान मोठ्या उद्योजकांना व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच मोदी सरकारने देशात स्वदेशीचा नारा सुरू केला असून सर्वांनी याला प्रतिसाद देऊन जीवनात स्वदेशीचाच वापर करावा असे आवाहन देखील यावेळी नामदार मेघना बोर्डीकर यांनी केले.
यावेळी अशोकराव काकडे ,दिनकर वाघ ,गणेश काटकर यांची उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com