रमेश बिजुले
पाथरी : पाथरी तालुक्यातील हदगाव बुद्रुक येथे मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ओसंडून वाहणाऱ्या लेंडी नदी व दोन्ही नाल्याच्या पाण्यामुळे इंदिरानगर भागातील सर्व घरे आणि जिल्हा परिषद शाळा तीन ते चार फूट पाण्यात गेली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीचे मदतकार्य सुरू केले आहे.
हादगांव बुद्रुक येथील पूरपरिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदार एस.एन. हंडेश्वर, पोलीस निरीक्षक महेश लांडगे,तलाठी आर.के.कोल्हे,ग्रामसेवक कुलदिप फंड,नागोराव पवार, चेअरमन बाबासाहेब नखाते, ग्रा.प.सदस्य बि.टी.कदम,शेख अशपाक,न.फ.पाथरीचे अग्निशमन पथक हे पहाटेपासूनच मदतीसाठी तैनात आहेत. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम जलद गतीने सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.रेणाखळी आणि किन्होळा,वरखेड या परिसरातील दोन्ही नाले अरुंद हा हादगांव बु.परिसरात लेंडी नदिला संगम पावतो त्यामुळे दरवर्षी थोडासा पाऊस जरी झाला तरी पूरस्थिती उद्भवते व नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे या लेंडी नदिसह दोन्ही नाल्याचे दोन्ही बाजुने दोन – दोन किलोमीटर खोलीकरण व सरळीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी नागरीकांनी सांगीतले.
Shabdraj www.shabdraj.com