16/10/26
Breaking News

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ,सोमवारच्या सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा

देशात पुन्हा एकदा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याला आणि चांदीला झळाळी मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने, चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात चांदीचे दर प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढले आहेत. तर सोन्याच्या दरातही ३७७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगाव अन् दिल्लीसह देशात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा असतील. डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक बाजरासोबत देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

भारतात सोन्याच्या किमती प्रत्येक आठवड्याला बदलत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता अन् डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात बदल होत आहे. मागील आठवड्यात २४ कॅरेट सोन्याने ३७७० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३,४५० रुपयांची वाढ झाली आहे. १४ डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,३४,०७० रुपये होता. पुणे, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १२२७५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १३३९१० रुपये आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. त्यात रूपयांची घसरणही सुरूच आहे. परिणामी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढली. त्यामुळे किमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरल बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केल्याने बाँड उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे कल केलाय. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत या वर्षी आतापर्यंत ६५% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत या वर्षी आतापर्यंत अंदाजे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …