17/07/26
Breaking News

सेलूत शनिवारी ‘सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा

सेलू ( प्रतिनिधी )
येथील स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवारी श्री साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास राजयोगिनी ब्रह्मकुमारी करूणा दीदी (सेवा केंद्र, भोसरी, पुणे) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर अध्यक्षस्थानी ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे राहणार आहेत. यावेळी भावना मुंगसे-बोर्डीकर, आर. बी. घोडके, सभापती विजयमाला डोंबे, डॉ. संजय रोडगे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, दिनकर वाघ, गणेश काटकर, अशोक शेलार जि.प. सदस्य अजय डासाळकर, योगिता मोरे, डॉ. आशिष डख, संजय साडेगावकर, रामेश्वर राठी, डॉ. सुनील कुलकर्णी, प्रा. के. डी. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सन्मान कर्तृत्वाचा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अध्यात्म, शेती, वैद्यकीय, पत्रकारिता, साहित्य, नाट्य व कला, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यामध्ये ह.भ.प. पंडित महाराज डाके, अरुणा थोरे, ह.भ.प. रमेश महाराज मोरे, डॉ. दिगंबर घोडके, पत्रकार दिलीप डासाळकर, डॉ. सुरेश हिवाळे, प्रा. अनिल कुलकर्णी, माधव गव्हाणे, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, गणेश माळवे आदींचा समावेश आहे. यावेळी मीनाताई बोर्डीकर यांचा मातृगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे‌.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …