15/12/25
Breaking News

सेलूत रंगभरण चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी )
येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आणि सेलू शहर विकासाचे शिल्पकार पहिले नगराध्यक्ष दलितमित्र कै.श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, ता.२६ नोव्हेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालयात सकाळी ९ वाजता करण्यात आले. स्पर्धेला विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ६६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सेलू शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे हे १८ वर्षे आहे. भांगडीया यांच्या कार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली जाते.

स्पर्धेच्या शुभारंभ बालचिमुकल्या चित्रकारांच्या हस्ते श्रीरामजी भांगडिया प्रतिमा पूजनाने झाला. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता, मतदान जनजागृती आदी विषयावर स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने चित्रे साकारले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक आर. डी. कटारे, बाबासाहेब हेलसकर, कलाशिक्षक फुलसिंग गावित, कीर्ती राऊत, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, पांडुरंग पाटणकर, उमेश क्षीरसागर, प्रभू भुसारे, सुजय कांबळे, नंदू चव्हाण
मीरा शेटे, सोनाली शेरे, अदिती आंबेकर, अश्विनी पटाईत, राजेश्वर पवार, सीमा पिंपळे, माधुरी कुंभार, अरुण रामपूरकर, गोविंद रामपूरकर, केशव डहाळे, दिलीप जाधव आदींसह विविध शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या …