04/02/26
Breaking News

डोळ्यातून अश्रू…..मनोज जरांगे पाटील यांच भावनिक भाषण..

आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.  ‘शररीरात ताकद नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा, एक पाच सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. प्रत्येकाला सांगितलं होतं, मी थोड्याच दिवसाचा पाव्हणा आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे..

विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. मायबापहो… मला बोलायला लई त्रास होतोय, आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. जशी मला मिळाली, तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे. मी 5-6 महिन्यांपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं. त्यावेळी, नारायण गडावरील वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, जरांगे पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते. तरीही, जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं.

दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो, जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावंही लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनापुढे उभं राहावं लागतं, तुमच्या पोरांना तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. तुमचं पोरगं-पोरगी तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. अधिकारी बनवा. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरु गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल. सगळे बोगस लोकं जाऊन तिथे बसलेत, बोगस आरक्षण घेतलेले बसलेत बोगस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचं आवाहन केलंय. तसेच, मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या, असेही पाटील यांनी सांगितले. 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …