04/02/26
Breaking News

सन्मानपूर्वक युती न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे- हरिभाऊ लहाने 

सेलू,दि 29( प्रतिनिधी )
राज्यात भारतीय जनता पार्टी ,शिवसेना व अजित पवार गट यांच्या युतीचे सरकार आहे .परंतु नुकत्याच होऊ घातलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर युती झाली नाही तर निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे .त्यानुसार नगर परिषद निवडणुकीत जर सन्मानपूर्वक युती झाली नाही तर आम्हांला देखील आमचा मार्ग मोकळा आहे .अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सेलूचे नेते माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी प्रतिनिधींशी बोलतांना दिली आहे
लवकरच नगर परिषदेची निवडणूक होणार असून सर्वच पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागले आहेत .भाजप ,शिवसेना ,उबाठा ,कांग्रेस , शरद पवार राष्ट्रवादी गट व राष्ट्रवादी या सर्वच पक्षाकडून प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे .नुकतीच आघाडीची बैठक खासदार संजय जाधव ,माजी आमदार विजयराव भांबळे व काँग्रेस चे हेमंतराव आडळकर यांची बैठक होऊन आघाडीच्या वतीने नगर परिषद निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे .परंतु राज्यात युती असलेल्या भारतीय जनता पक्ष ,शिवसेना व राष्ट्रवादी यांनी आपली भूमिका अजूनही जाहीर केली नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत .याबाबत शिवसेनेचे सेलूचे नेते हरिभाऊ लहाने यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …